बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वात विशेष नाकाबंदी व वॉरंट तामिली
बाबतची विशेष मोहिम राबविण्यात आली.दरम्यान एनबीडब्ल्यू-109, बेलेबल-98 वॉरंटची बजावणी तर 1441 वाहनांची तपासणी करण्यात येऊन 24,700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार संहिता लागू झालीय. ही निवडणूक भयविरहित व मुक्त वातारणात होण्यासाठी तसेच आगामी दिपावली व इतर धार्मीक
सणोत्सव आनंदात पार पाडण्यासाठी समाज कंटक, गुंड प्रवृत्तीचे इसम, मालमत्ता संबंधीत गुन्हे करणारे गुन्हेगार यांचेवर पोलीस प्रशासनाचा अंकुश राहून, न्यायालयीन प्रलंबीत वॉरंटची मोठ्या प्रमाणात बजावणी होणे
आवश्यक आहे.
यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशाने तर अपर पोलीस अधीक्षक
अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली 21 ऑक्टोंबर च्या रात्री 11 वाजता पासून तर 22 ऑक्टोबरच्या पहाटे 5 वाजेपर्यंत संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष नाकाबंदी व वॉरंट तामिली
बाबतची विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर नाकाबंदी पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, खामगांव व बुलढाणा, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, 33 पोलीस स्टेशन, सर्व शाखा, आर.सी.पी. व क्युआरटी
पथकांकडून विशेष मोहिमेमध्ये सहभाग नोंदविण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यात 51 महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पॉईट लावण्यात आले त्याच बरोबर प्रत्येक पो.स्टे.च्या स्तरावर 02 पथकांकडून न्यायालयीन प्रलंबीत वॉरंटची
तामिली करण्यात आली. सदर कार्यवाहीमध्ये जिल्ह्याचे अभिलेखावरील फरारी आरोपी, निगराणी बदमाश इसम, वॉरंटमधील व्यक्तींचा शोध घेण्यात आला. त्याच बरोबर हॉटेल्स,लॉजेस, बसस्टँड,रेल्वे स्टेशन या
ठिकाणी पाहणी करण्यात आली. सदर कार्यवाहीमध्ये नाकाबंदी दरम्यान 1441 वाहने चेक करण्यात येवून त्यामध्ये 122 वाहनांवर मो.वा.का. प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीमध्ये 24,700 रुपये दंड
स्वरुपामध्ये आकारण्यात आला. तसेच प्रलंबीत वॉरंटमध्ये अजामीनपात्र 109 वॉरंट तर जामीनपात्र 98 वॉरंट तामिल करण्यात आले. अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी यांना आज रोजी संबंधीत न्यायालये यांचे समक्ष हजर
करण्यात येत आहे. सदर विशेष मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सक्रिय सहभाग घेवून,जिल्ह्यातील विवीध नाकाबंदी पॉइंट चेक करुन, नाकाबंदी व पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना
विशेष मोहिम यशस्वी होणे करीता मार्गदर्शन केले. त्याच बरोबर अपर पोलीस अधीक्षक खामगांव व बुलढाणा
आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपापले हद्दीतील पोलीस स्टेशनच्या पॉइंटला भेटी देऊन कार्यवाहीचा आढावा घेतला. ही कारवाई पोनि अशोक एन. लांडे स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा, सर्व पो.स्टे.
प्रभारी अधिकारी बुलढाणा जिल्हा, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेवून केली आहे.