बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र यातून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाही.कारण मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपात रस्सीखेच सुरू आहे.भाजपा ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती व भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांच्यात उमेदवारीसाठी ताणाताणी सुरु असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती तब्बल पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.मात्र भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे पाटील यांनी त्यांच्यापुढे आव्हान उभे केले असून त्या भाजपाची उमेदवारी मागित आहेत.हा पेच भाजपाला सोडविता आला नसल्याने त्यांनी मलकापूर वगळता 99 उमेदवारांची यादी जाहीर केली.परिणामी उमेदवारीसाठी दोघेही मुंबईत ठाण मांडून बसलेत.दरम्यान संचेती यांना भाजप आणि उमेदवारी दिली तर उमा तायडे ह्या अपक्ष निवडणूक लढतील आणि याचा दुष्परिणाम भाजपाला भोगावा लागेल अशी प्रतिक्रिया उमा तायडे यांचे पती शिवचंद्र तायडे यांनी दिली आहे.