रायपूर (हॅलो बुलढाणा/ सचिन जयस्वाल) लोकशाहीत मतदान करणे महत्त्वाचे आहे परंतू यापेक्षाही दानात दान म्हणून मरणोत्तर देहदान करणे सर्वश्रेष्ठ मानल्या जाते.
रायपूर या गावातील सर्वांचे परिचित गणेश बाहेती यांनी मरणोत्तर देहदान केले आहे.अकोला येथील मेडिकल कॉलेजला विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मरणोत्तर हा त्याग केला आहे. गावामध्ये काकाजी या नावाने संबोधल्या जाणारे गणेश बाहेती समाजकार्यासाठी नेहमी तत्पर होते. काकाजी यांच्या कारकीर्दीत नवयुवक मंडळाचे ते अध्यक्ष असताना, त्यांनी समाजकार्यासाठी बरीच कामे केली. त्यात जनतेसाठी सरकारी वैद्यकीय दवाखाना, विद्युत महामंडळ, टेलिफोन कार्यालय,पोलीस चौकी स्थापन करण्यासाठी मोठी धावपळ केली होती. काकाजी राष्ट्रवादी कार्यकर्ते होते. शरद पवार साहेब यांच्याशी खूप एकनिष्ठ होते.
मानवी शरीर दान केल्यावर त्यातील अवयव अनेक गरजूंच्या शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकते तर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हा प्रकार मानवी देह समजून
आणि संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. वैद्यकीय संशोधनासाठी मानवी देह अती आवश्यक असतो. मूलगामी वैद्यकीय संशोधनात मोठी भरारी घेण्यासाठी वैज्ञानिकांनी मानवी देहांवरील विविध आजारांमुळे झालेले परिणाम जाणून घेणे गरजेचे असते. आता बाहेतींच्या या देहदानामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सकारात्मक परिणाम दिसून येईल!