बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिरतरुण व आश्वासक चेहरा म्हणून योगेश जाधव यांचा योग यंदा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येत आहे.
केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यांना शेतकरी वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय लोकसभेत निवडून आलेले आणि केंद्रीय मंत्री झालेले प्रतापराव जाधव यांचा पाठिंबा असल्याने इतर उमेदवारांची गोची झाली असून,आगामी निवडणूक चांगलीच राहणार आहे.
देश घडवण्याची ताकद युवा मतदारांमध्ये असते.यात युवा मतदारांनी राष्ट्र सेवा म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासह मतदान साक्षरतेसाठीही सहभाग घेणे आवश्यक आहे. लोकशाहीत युवकांची भूमिका ही प्रत्येक देशात सिध्द झालेली आहे. अनेक देशात युवकांनी क्रांती केली आहे.या अनुषंगाने युवा मतदार सिंदखेडराजा विधानसभा निवडणुकीत आश्वासक चेहरा पाहत असून इच्छुक उमेदवार योगेश जाधव यांना पाठिंबा देत असल्याने योगेश जाधव यांची बाजू सध्या तरी भक्कम दिसत आहे.











