बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘हॅलो बुलढाणा’ने जाहीर केलेले काँग्रेसचे उमेदवार पक्के आहेत.शिवाय बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी दोन्ही आघाड्यांच्या जागा वाटपाचं अद्याप भिजत घोंगड आहे. दरम्यान काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात टोकाचा वाद सुरू असून आज इतर ठिकाणच्या जागा संदर्भात चर्चा झाली आहे.उद्या या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
नाना पटोले यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस व महायुतीमध्येही संभ्रम सुरू आहे. आमच्यात कुठलेही वाद नाहीत. काल काही कारणास्तव आमची सीईसी रद्द झाली, आज होतेय.विदर्भातील कुठल्याच जागे बाबत वाद नाहीत, असं म्हणत नाना पटोले यांनी ठाकरे गटासोबतच्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.खर्गेसोबतच्या बैठकीमध्ये नाराजी बाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं नाना पटोले म्हणालेत.दरम्यान काँग्रेसचे चिखली येथील राहुल बोंद्रे,खामगाव येथील दिलीप कुमार सानंदा, मलकापूर येथील राजेश एकडे यांची उमेदवारी फिक्स समजल्या जात आहे.