10 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

भाजपाचे हिंदुत्व..शहर नामांतराचे सोंग उघडे पडले ! -भाजपा उमेदवारांच्या यादीत संभाजीनगर एवजी औरंगाबाद असे नाव ! -सोशल मीडियावर मेसेज होताहेत व्हायरल !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज भाजपाने विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान या यादीत संभाजीनगर येवजी औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आल्याने ‘भाजपाचे हिंदुत्व ..शहरांचे नामांतरांचे सोंग उघडे ‘ असा मेसेज समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

औरंगाबाद आणि धाराशीव या शहरांचं नामांतर करण्यात आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता.औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशीव असे करण्यात आले होते. दरम्यान आज भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.या यादीमध्ये औरंगाबाद पूर्व असा उल्लेख करण्यात आल्याने
‘भाजपाचे हिंदुत्व ..शहरांचे नामांतरांचे सोंग उघडे ‘असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!