बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार राजेंद्र शिंगणे राकाँच्या शरद पवार गटात सामिल झाल्याने शिंगणे यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देणार असल्याचे अजित पवार गटाचे नेते तुकाराम अंभोरे पाटील म्हणाले.
महायुतीच्या तीन पक्षांपैकी सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात एकच उमेदवार असणार आहे. दरम्यान राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देणार असून महायुतीचा विजय व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष तुकाराम आंभोरे पाटील पदाधिकाऱ्यांना म्हणाले
असून त्यांनी राजेंद्र शिंगणे यांना घरचा आहेर दिलाय.