8.5 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

व्याजाचे पैसे थकल्यामुळे मुलाला जीवे मारले! पीडितेचा आरोप न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर कुटुंबियांचे उपोषण सुरू

  • बुलडाणा (हॅलो बुलढाणा) व्याजाने पैसे घेतल्याच्या वादातून मुलाला मारून टाकल्याचा आरोप राजू नंनवरे यांनी केला असून न्यायासाठी कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले आहे. या संदर्भातील निवेदन देखील जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. राजू नंनवरे रा. माळी पेठ तालुका मेहकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, याच गावातील आरोपी अवैध सावकार योगेश सौभागे याच्या सुनिल थिगळे या मित्रामार्फत माझ्या आकाश नामक मुलाने व्याजाने पैसे घेतले होते. हप्ता थकल्यामुळे आरोपी योगेश सौभागे, सुनिल थिगळे बरोबर आकाशला जिवे मारण्याची धमकी देत होते. दरम्यान 24/05/2024 रोजी उपरोक्त आरोपी व इतर हस्तकांनी आकाशला जबर मारहाण केली. आकाशला रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय समोर संपूर्ण कुटुंब न्याय मिळण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहे पावसाळा सुरू झाला आहे पाऊस येत असताना सुद्धा कुटुंब मांगे हटत नाही जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे.
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!