बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी यावेळी उद्धवसेनेने प्रचंड ताकद लावली असून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाल्याचे दिसते. इच्छुक उमेदवारांचे पक्षश्रेष्ठींकडे हेलपाटे सुरू असून हा पेच कसा सुटणार ? याची उत्सुकता बुलढाणेकरांना लागली आहे.
विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना वेग आलाय. महाविकास आघाडीमध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे.
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांची तिकीट फिक्स असल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी उद्धव सेनाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत प्रा नरेंद्र खेडेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दंड थोपटले आहे.निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते कार्यरत आहेत.परंतु शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभेत तब्बल अडीच लाख मते प्राप्त केल्याने आणि त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांना भेट देऊन चर्चा केल्याने उद्धवसेनेची तिकीट कोणाला ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.दरम्यान काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री ताई शेळके यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्याशी तत्पूर्वी संपर्क साधला होता.तर बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. त्यामुळे तिकीट कुणाला मिळणार याची चुरस आणखीच वाढली आहे. दरम्यान उद्धव सेनेची तिकीट रविकांत तुपकर किंवा जयश्रीताई शेळके यांना मिळाल्यास उबाठा शिवसेनेचा विजय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.