देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा /संतोष जाधव) सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात घरवापसी केली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे छोटेखानी कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार, पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे इतर नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश सोहळा पार पडला. विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रवेश सोहळा पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून सिंदखेड राजा मतदार संघाची राजकीय पंढरी म्हणून ओळख असलेल्या देऊळगांव महीच्या बस स्टॉप चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी “रामकृष्ण हरी वाजवा तुतारी” “देश का नेता कैसा हो शरदचंद्र पवार साहेब जैसा हो….” “डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…” अशा घोषणाबाजी देण्यात आल्या. याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसून आले. यावेळी माजी अर्थ व बांधकाम सभापती रियाजखान पठाण, सभापती समाधान शिंगणे, माजी सभापती नितीन शिंगणे,गजानन चित्ते,नंदू राऊत,माजी सरपंच रामकिसन म्हस्के,युवा नेते गजानन चेके,मन्नानखान पठाण, तुकाराम महाराज शिंगणे,सुभाष शिंगणे, रविंद्र इंगळे, उमेश शिंगणे,भास्कर शिंगणे,शिवानंद शिंदे, संतोष ठेंग, शिंदे,संदीप टाले मो.आशिक,अशोक पाबळे,सुरेश झिने, अभिजित शिंगणे,रामचंद्र वायाळ, शिवाजी शिंगणे,रावसाहेब पाटील गाढवे,सरपंच गणेश नागरे,पंढरीनाथ डोके,भगवान जोशी यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.