spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! चिखली मतदारसंघातील समीकरण बदलणार ! -रासपचा भाजपला धक्का! -रासप स्वबळावर लढणार!

चिखली (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा निवडणुकीत रासप स्वबळावर लढणार असून हा भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे. विशेषता चिखली मतदारसंघातील समीकरण बदलणार असून येथे रासप तुल्यबळ उमेदवार देणार आहे.

19 ऑक्टोबर रोजी चिखली येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील 288 जागा स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले. भाजपने परभणी लोकसभा निवडणुकीत जो कुटील डाव खेळला त्याचा हा परिणाम विधानसभेत दिसून येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी तौफीक शेख प्रदेश उपाध्यक्ष,सुभाष राजपूत, माजी प्रदेश अध्यक्ष गायकवाड़ , विधानसभा अध्यक्ष सिंदखेडराजा,
अतुल भूसारी संपर्क प्रमुख ,सिद्धार्थ पैठने जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक सेल यांची उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!