देऊळगाव साकरशा (हॅलो बुलढाणा/गणेश पाटील) म्हणतात ना जिद्द चिकाटी आणि प्रयत्नाच्या जोरावर कुठलीही गोष्ट अशक्य नसते याचाच प्रयत्न बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या मोहना या गावातील बंजारा समाजातील विद्यार्थी विवेक गणेश आडे यांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशाला गवसणी घातली आहे. गावामध्ये प्राथमिक शिक्षणात व्यतिरिक्त कुठल्याही शिक्षणाचे व्यवस्था नसताना गावामध्ये जाण्यासाठी एसटी बसेसची सुद्धा सुविधा नसताना केवळ जिद्द आणि चिकटीच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर संपादन केले असून सन 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केले.या परीक्षेमध्ये त्याने 166.66 गुण प्राप्त करून व्हीं जे एन टी मधून महाराष्ट्र राज्य मधून प्रथम क्रमांक मिळविला असून विवेक चे वडील देऊळगाव साखरशा येथील बुलढाणा अर्बनच्या बँकेच्या शाखेच्या शाखा व्यवस्थापक पदी काम करत असून आपल्या मुलाने उत्कृष्ट असे यश संपादन केल्याबद्दल त्यांना अभिमान वाटतोय. तसेच परिसरामध्ये त्याचे कौतुक होत आहे.