चिखली (हॅलो बुलढाणा) चिखली येथील व्यापारी राजेंद्र बाबूलाल अग्रवाल बालाजी ॲग्रो इंडस्ट्रीज यांची १९ लाख ४ हजार २७ रुपये जीएसटी सह ची फसवणूक झाल्याने त्यांनी १५ जुलै २०२४ रोजी गणेश शिवशंकर गोयनका, केतन गणेश गोयनका, नवलचंद सोहालाल जैन व पराग शहा या लोकांविरुद्ध चिखली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. यावरून चिखली पोलिसांनी चारी लोकांविरुद्ध भादवी १८६० चे कलम ४२०, ४०९ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता.
तर पैश्यांची वसुली व्हावी याकरिता राजेंद्र अग्रवाल यांनी बुलढाणा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायालय बुलढाणा यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी एक यआदेश दिला आहे, ज्यामध्ये बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीज (मालक राजेंद्र बाबूलाल अग्रवाल) विरुद्ध गोयंका प्रोटीन्स प्रा. लि. (संचालक गणेश शिवशंकर गोयंका) या प्रकरणातील समन्स व तात्पुरत्या मनाई आदेशासंदर्भात निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, गोयंका प्रोटीन्स प्रा. लि. यांना समन्स आणि तात्पुरत्या मनाई आदेशाची नोटीस देण्यात येणार असून, प्रतिवादीने न्यायालयात हजर राहून तात्पुरत्या मनाई आदेशाबाबत आपले म्हणणे सादर करणे आवश्यक आहे.
तसेच, न्यायालयाने आदेश दिला आहे की, प्रतिवादी हजर होईपर्यंत सदर प्रकरणात यथास्थिती राखण्यात यावी आणि प्रतिवादीने कोणतीही मालमत्ता विकू नये, हस्तांतरीत करू नये किंवा अन्य कोणत्याही तऱ्हेने त्याची विक्री करू नये.
सदर प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निश्चित करण्यात आली आहे, ज्या दिवशी प्रतिवादीला न्यायालयात उपस्थित राहून आपले उत्तर सादर करणे आवश्यक आहे. अशी माहिती राजेंद्र बाबूलाल अग्रवाल यांचे अधिवक्ता एड.अजय दिनोदे यांनी दिली आहे.