बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आता खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून,मेहकर विधानसभा मतदारसंघात संतोष चंद्रभान तायडे नावाचे भगवे वादळ घोंगावतय ! दरम्यान संतोष तायडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी उबाठा शिवसेनेचे कल्याणचे तालुकाप्रमुख व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे समन्वय विश्वनाथ हरिभाऊ जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.
संतोष चंद्रभान तायडे हे कल्याण तालुक्यातील मौजे जांभूळ येथे वडिलांच्या नोकरीच्या गावी प्रधामिक शिक्षण व उच्च शिक्षण व उद्योग धंदे याकरिता सन १९७८ ते २०१६ या कार्यकाळामध्ये राहात होते.ते १९९५ पासून शिवसैनिक असून त्यांच्या तरुण वयात त्यांनी
उत्तम प्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम केले आहे. पक्षाच्या सर्व उपक्रमात ते हिरीरीने भाग घेत असत.ते २०१६ पर्यंत कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात समाजसेवेच्या माध्यमातून प्रसिद्ध होते.
ते सन २००४ ते २००८ या कालावधीत भारतीय विद्यार्थी सेनेचे सक्रीय कार्यकर्ते विश्वनाथ जाधव यांच्या सोबत कल्याण मधील बिर्ला कॉलेज व अग्रवाल कॉलेज च्या शिवसेनेने छेडलेल्या आंदोलनात सक्रीय सहभागी होते.२०१६ नंतर ते त्यांच्या मूळ गावी खामगाव येथे राहायला गेले. परंतू ते आज पर्यंत शिवसेनचेच काम करत आहेत. संतोष तायडे आता शिवउद्योग सहकार सेनेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर जिल्हा बुलढाणा येथे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रा मध्ये त्याचं काम अतिशय भरीव आणि प्रभावी असून शिवसेनेच्या प्रत्येक उपक्रमात ते हिरीरीने भाग घेत असतात.
शिवउद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून अनेक रोजगार मेळावे भरवून खूप मोठ्या प्रमाणात
ते तरुणांना रोजगार देण्यात व उद्योग धंदे देण्यात यशस्वी ठरलेत. ते निष्ठावंत शिवसैनिक असून कायमस्वरूपी आपल्या सोबत एकनिष्ठ राहतील अशी ग्वाही जाधव यांनी दिली आहे. संतोष चंद्रभान तायडे हे उच्च शिक्षित असून त्यांची पत्नी सौ. तायडे त्यांचे कार्यक्षेत्र खामगाव विधानसभेच्या अंतर्गत आहे. त्यांचे ही
लोकांप्रति खूप चांगले संबंध आहेत व त्याही शिवसेनेवर नितांत प्रेम करणाऱ्या एक सक्षम
महिला आहेत. परिणामी खामगाव व मेहेकर हे दोन्ही मतदार संघाच्या सीमा एकमेकांस लागून असून दोन्ही मतदारसंघात त्यांचा अतिशय बोलबाला असल्याने संतोष चंद्रभान तायडे यांना आपल्या पक्षाकडून मेहेकर विधानसभा
क्र. २५ ची उमेदवारी द्यावी अशी मागणी उबाठा शिवसेनेचे कल्याणचे तालुकाप्रमुख व भिवंडी लोकसभा मतदारसंघ समन्वयक विश्वनाथ जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना केली आहे.
कोण आहेत डॉ.तायडे?
डॉक्टर संतोष तायडे यांचा परिचय तसा म्हटलं तर मेहकर विधानसभा मध्ये 1995 पासून त्यांचे जाणे येणे सुरू आहे. मेहकर मतदारसंघात त्यांची जुनी नाळ जुळलेले आहे प्राध्यापक भास्कर इंगळे एन आर बोरकर तसेच लोणी लव्हाळा येथील श्रीराम जाधव नितीन मोरे कैलास अंभोरे अलकाताई खंडारे अशा लोकांशी त्यांचा दांडगा संपर्क व नाते आहे त्यामुळे या मेहकर विधानसभा मध्ये त्यांना ओळखणार नाही असे कोणी नाही स्व.आनंदजी दिघे साहेब यांच्या तालमीत तयार होणारे संतोष तायडे असा त्यांचा हा दांडगा परिचय आहे. स्व.आनंदजी दिघे साहेब व एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासोबत राहून ते शिवसेनेमध्ये मोठे झाले मात्र पक्ष फुठला त्यावेळी त्यांनी आपली एकनिष्ठता म्हणून उद्धवजी स्व.बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटामध्ये शेवटपर्यंत टिकून राहील निष्ठावंत काय असते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर संतोष तायडे त्यामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी आपली उमेदवारी वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
क्रमशा :