8.5 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

बुलढाण्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पोलीस प्रशासन सज्ज! भरती दरम्यान काही गैरप्रकार आढळून आल्यास पोलीस प्रशासनाला कळवावे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आव्हान

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खाकी वर्दी अंगावर असावी,असे अनेकांचे स्वप्न असते. आणि या स्वप्नपूर्तीसाठी आजचा तरुण वाटेल ते कष्ट उपसत असतो. राज्यात निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही भरती उशिरा घेण्यात येत आहे. बुलढाण्यात तब्बल 133 जागांसाठी 10,236 अर्ज प्राप्त झाले आहे. मैदानी चाचणी करिता सुरुवातीच्या दोन दिवस प्रतिदिन 500 याप्रमाणे उमेदवार बोलविण्यात आले असून उर्वरित दिवशी बोलाविण्यात आलेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदनिहाय प्रमाणे पोलीस शिपाई- १२५ पदे ( ३८ पदे महिलाकरीता व उर्वरित ८७ पदे पुरुष सर्वसाधारण) उमेदवारांकरीता आहे व पोलीस शिपाई (बॅण्डस्मन ) – ०८ (०२ महिला व ०६ पुरुष सर्वसाधारण) पदे अशी एकुण १३३ रिक्त पदांची पदभरती दिनांक १९/०६/२०२४ते दि. ०३/०७/२०२४पर्यंत एकुण १३ दिवसाच्या कालावधीमध्ये शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी / कागदपत्र पडताळणीबाबतची प्रक्रियेची कार्यवाही पोलीस कवायत मैदान, पोलीसमुख्यालय बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेली आहे.सदर पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई पदाकरीता ८५३१ व पोलीस शिपाई (बॅण्डस्मन) पदाकरीता १७०५ असे एकुण १०२३६ आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत.उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी (छाती /उंची) व मैदानी चाचणी १०० मीटर धावणे व गोळा फेक या मैदानी चाचण्या हया पोलीस मुख्यालय बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर घेण्यात येणार असुन १६०० मीटर धावणे व ८०० धावण्याची चाचणी बुलडाणा ते धाड रोडवरील निश्चीती केलेल्या ठिकाणी घेण्यात येत आहे. सदर रस्तावरील मैदानी चाचणी दरम्यानची पर्यायी वाहतुक व्यवस्था जिल्हा पोलीस दलाचे वतीने करण्यात आली आहे.भरतीच्या दरम्यान काही गैरप्रकार आढळून आल्यास जसे की पैशाची मागणी करून नोकरीला लावून देतो असे कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका आढळून आल्यास त्वरित पोलीस प्रशासनाला कळवावे तसेच तसेच उमेदवारांनी भरती दरम्यान मादक किंवा स्टेनोज किंवा शक्ती वर्धन औषध घेऊन ज्यामुळे आपण भरती दरम्यान फिजिकल परफॉर्मन्स चांगला होईल या उद्देशाने आल्यास त्यांची मेडिकल तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!