बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विविध सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असलेले जिल्हा भूषण प्रा. सुनील सपकाळ यांची नागपूर शिक्षण मंडळाच्या बोर्ड मेंबर पदी शासनाने नियुक्ती केली आहे.
सुनील सपकाळ यांच्या या निवडी मुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्याच बरोबर प्राचार्य सुनील जवंजाळ यांना ही सदस्य पदी स्थान मिळाले आहे.
शासनाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर नियुक्त्या केल्या.त्यात
सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहे. सुनील सपकाळ हे सेलसुर येथे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत व्यासंगी व प्रयोगशील म्हणून ते ओळखले जातात.तर प्रा. सुनील जवंजाळ कोलवड येथील विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य असून राज्य पुरस्कार प्राप्त, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. सुनील नामदेवराव जवंजाळ यांची अशासकीय सदस्य (बोर्ड मेंबर) पदी नियुक्ती शासनाने केली आहे. तर नागपुर विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर
सुनिल प्रतापराव सपकाळ यांची अशासकीय सदस्य (बोर्ड मेंबर) पदी नियुक्ती शासनाने केली आहे. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी
असल्याने त्यांची निवड झाली आहे. सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत
आहे.