spot_img
spot_img

टॉवरची रेंज आहे की ‘मिस्टर इंडिया?’ -मोबाईल धारक हैराण !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/सचिन जयस्वाल) रायपूर गावामध्ये विविध प्रकारचे मोबाईल टॉवर उभे आहे. मात्र टॉवरची रेंज मिस्टर इंडिया सारखी झालेली आहे. कधी आहे कधी नाही हे कळतच नाही. दिवसा असो वा रात्री रेंज केव्हा जाईन सांगता येत नाही. त्यामुळे मोबाईलधारक पुरते हैराण झाले आहेत.

मोबाईलने जग जवळ आले. प्रत्येक हातात मोबाईल दिसून पडतात.कारण मोबाईल माणसाचा अविभाज्य घटक बनला आहे.मात्र रायपूर गाव परिसरात टॉवर असूनही रेंज मिळत नसल्याने मोबाईल धारकांची अवस्था वेड्यासारखी झाल्याचे दिसून येते.मोबाईलवर बोलता बोलता फोन कट होणे, वनवे होणे, दुसऱ्या कोणालाच कॉल लागणे, अशा विविध प्रकारच्या समस्यांना मोबाईल धारक सामोरे जात आहे. रायपूर या गावाला आजूबाजूचे 10 ते 15 खेडे आहेत आणि रायपूर हे व्यवहाराचे केंद्रबिंदू आहे. परंतु ग्रामस्थांना रेंज नसल्याने नाहक त्रास सोसावा लागतोय. बीएसएनएल ह्या कंपनीचे नेटवर्क फारच कमी आहे, बहुतांश सरकारी कार्यालय हे बीएसएनएल नेटवर्क सोबत चालतात.आता कोणते सिमकार्ड वापरावे हेच आता ग्रामस्थांच्या लक्षात येत नाही, दरम्यान नेटवर्क सुविधा सुरळीत देण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!