spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! व्वा रे वा ! मतदारयादीतून चक्क सरपंचाचे नाव कमी करण्याचा प्रयत्न !

चिखली (हॅलो बुलढाणा) मतदार यादीतून चक्क सरपंचाचे नाव कमी करण्याचा प्रयत्न हा स्थानिक आमदारांच्या षड्यंत्राचा भाग असल्याचा संशय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राज्य सरचिटणीस संजय गाडेकर

यांनी व्यक्त केला आहे.या संदर्भातील त्यांची पोस्ट तुफान व्हायरल होत असून भाजपावर षडयंत्र असल्याचा चौफेर आरोप होत असल्याने भाजपा अडचणीत सापडली आहे.

मतदार यादीतून चक्क सरपंचाचे नाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे
हा प्रकार लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे आणि सत्तेचा गैरवापर दर्शवतो. स्थानिक नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा पद्धतींचा अवलंब करत असतील, तर यावर तातडीने तपास होऊन कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी जागरूक राहून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,अशी मागणी संजय गाडेकर यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!