बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पक्षाच्या कोणत्याही उमेदवारानं आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाईल,असा स्पष्ट इशारा चिखली विधानसभाचे निवडणूक निर्णयाधिकारी राजेंद्र कुळ यांनी दिला आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखलं जाऊ शकतं. तसंच आवश्यक असल्यास फौजदारी खटला देखील दाखल केला जाऊ शकतो. शिवाय नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागू शकते.त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन त्यांनी ‘हॅलो बुलढाणा’ शी बोलताना केले आहे.यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष काकडे तसेच वृषाली केसकर उपस्थित होत्या.
चिखली विधानसभा मतदारसंघात चिखली व बुलढाणा या दोन तालुक्यांचा समावेश आहे.सन 2011 च्या लोकसंख्येनुसार या दोन्ही तालुक्यात तीन लाख 49 हजार 297 मतदार संख्या आहे.दोन्ही तालुक्या अंतर्गत चिखली,अंढेरा , अमडापूर ,रायपूर व धाड अशा 5 पोलीस स्टेशनचा समावेश आहे.चिखलीत 95 व बुलढाण्यात 44 गाव अशा 139 गावांमध्ये 317 मतदान केंद्र आहेत.तर तीन लाख तीन हजार तीनशे नव्वद मतदारसंघ आहे यात बदल देखील होऊ शकते.गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 62.21% मतदान झाले होते तर मागच्या विधानसभेत 65.49 एवढी टक्केवारी होती.आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध पथके तैनात केली असून नियमांचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाईल,असा स्पष्ट इशारा चिखली विधानसभाचे निवडणूक निर्णयाधिकारी राजेंद्र पौळ यांनी दिला आहे.