बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अभ्यास न करता यश कसे मिळेल यासाठी सध्याच्या काळात सगळ्याची धडपड सुरू असते. पण ते यश चिरकाल करणारे नसते. त्यातून का एकदा आयुष्याचा प्रवासाचा रस्ता चुकला तर तो सुरळीत होणे शक्यच नसते. आयुष्यात कामात पडणारे शिक्षण अभ्यासक्रम शिकवणे ही काळाची गरज आहे. आपण जे कार्य करतो त्यातूनच खूप शिकायला मिळते. महाराष्ट्रातील शिक्षणाची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे वातावरण असतांनाच गर्दे वाचनालयाने सुरू केलेल्या करियर कौन्सिलिंग केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी निश्चितच फायदा होईल असे मत करिअर कौन्सिलिंग केंद्राच्या व गर्दे वाचनालयाच्यावतीने साकारण्यात आलेल्या रंगमंचाच्या नुतनीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना भाईजी उर्फ राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ शर्मा होते. याप्रसंगी मंचावर चित्तरंजन राठी, विनायक वरणगावकर ,विश्वंभर वाघमारे, डॉ. सुभाष जोशी वाचनालयाचे सचिव उदय देशपांडे यांचे उपस्थिती होती. याप्रसंगी प्रास्ताविक करतांना विनय क्षीरसागर यांनी सामाजिक बांधिलकीची जपून करत असतानांच गर्दे वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेत असताना विद्यार्थी पैशाची गुंतवणूक करतात. त्यातून त्यांना योग्य वेळी यश मिळते असे नाही. हा वेगळा विचार करून व वेगळे उद्दिष्ट ठेवून गर्दे वाचनालयाच्यावतीने अभ्यास कसा, किती करावा व किती कालावधीत करावा म्हणून हा उपक्रम सुरू करून प्रकल्पाच्या माध्यमातून स्टडी मटेरियल व पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन त्याचे नियोजन ठराविक कालावधीत करून ते उत्तीर्ण कसे होतील याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. व त्यांना जॉब प्लेसमेंट साठी पण प्रयत्न करणार आहे. सध्याच्या काळात नवीन येणार्या ए आय तंत्रज्ञानाचे बेसिक ज्ञान देण्याचा प्रयत्न या करियर कौन्सिलच्यावतीने करण्यात येणार आहे. वेळेचे नियोजन व आत्म मूल्यांकनाची ही चळवळ या माध्यमातून राबविण्यात येण्यात असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी चित्तरंजन राठी यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण विद्यार्थ्यांना या कौन्सिलिंग केंद्राचा फायदा होईल. गर्दे वाचनालय हे वाचन संस्कृतीत जपणूक करणारे एक चांगलं केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बुलढाण्यातील कादंबरीकार अर्चना देव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन ॲड.अमोल बल्लाळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह गर्दे वाचनालयाच्या रसिक वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशुतोष वाईकर,डॉ.प्रविण पिंपरकर,संजय काळे,गिरीष वाईकर.संतो्ष सातपुते,संजय पाटील वाचनालयाचे ग्रंथपाल नेमिनाथ सातपुते, श्रीकांत कुलकर्णी, सचिन बल्लाळ, पालकर यांनी पुढाकार घेतला.