spot_img
spot_img

देऊळघाटात वादग्रस्त बॅनर झळकविल्याने राडा ! -पोलीस जीपचा काच फुटला,1 युवक जखमी,पोलिसांनी तणावसदृश्य परिस्थिती हाताळली !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल देऊळघाट येथे एका दुर्गाउत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांने वादग्रस्त बॅनर मिरवणुकीत झळकविल्याने तणावसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दगडफेकीत 13 ऑक्टोंबरला एक युवक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.जखमी युवकाला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे मोठा बंदोबस्त घेऊन देऊळघाट येथे दाखल झालेले आहे.

देऊळघाट येथील तेली गल्लीतील नवयुवक दुर्गा मंडळ 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जात होता.यावेळी काही दुर्गा भक्तांनी हातात वादग्रस्त बॅनर झळकविले असता याची माहिती काही तरुणांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचली व ते बॅनर जप्त करत मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलीस चौकीत आणले असता या वेळी बसस्टँड परिसरात तणाव निर्माण झाला व यात पोलीस जीपचे काचं फुटले.यावेळी शेख तनवीर हा तरुण जखमी झाल्याने त्याला अगोदर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला मार लागल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविले आहे. परिस्थिती हाता बाहेर जाण्या अगोदरच उपस्थित पोलिसांनी सर्वांना शांत केले.काही वेळातच जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घेऊन देऊळघाट येथे दाखल झाले. सोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, एलसीबी पीआय अशोक लांडे, डीएसबी प्रमुख सुनील अंबुलकर, बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे देखील पोहोचले. सद्या गावात तणावपूर्ण शांतता असून दुर्गा मिरवणूक सुरू आहे.कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!