10 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

उर्वरित शेतकऱ्यांचा पिक विमा घेतल्याशिवाय पुढाऱ्यांना गावात एंट्री देणार नाही असा निर्धार बैठकीत शेतकऱ्यांनी केला.-डॉ. ज्ञानेश्वर टाले पंधरा वर्षे सत्ता भोगणाऱ्या पुढार्‍यांनी राज्य सरकारचा पिकविम्याचा हिस्सा देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा गावागावात शेतकरी हीसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत-ऋषांक चव्हाण

मेहकर (हॅलो बुलडाणा) लोणार तालुक्यातील पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या गावागावात संवाद बैठका घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचे हक्काच्या लढाईसाठी शेतकऱ्यांनी तयार रहावे.आपला हक्काचा पिक विमा सरकारच्या व कंपनीच्या मानगुटिवर बसून घेऊ तोपर्यंत ही शेतकऱ्यांची लढाई थांबणार नाही मेहकर व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व संवाद बैठका गांवागावात डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या उपस्थितीत होत आहेत.मेहकर तालुक्यातील गणपुर,दादुलगव्हान,चिंचोली बोरे येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की जोपर्यंत उर्वरित सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत गावा गावामध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकारने जर पिक विमाचा त्यांचा हिस्सा दिला नाही तर येणाऱ्या काळात शेतकरी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.पिक विमा हा आमचा हक्क आहे.व त्यावरील १२% व्याज सुध्दा शेतकऱ्यांना मिळायला पाहीजेत. जर शेतकऱ्याच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न कोणी करत असेल त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय लोकं करत असून आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना आमचं सांगणं आहे की नौटंकी कोण करते कोण नाही हे सगळे शेतकऱ्यांना माहित आहे.तारीख पे तारीख कोण देत आहे. पीक विमा मागणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणार लवकरच ही पीक विम्याची लढाई एका वेगळ्या स्वरूपात पुढे येणार आहे यामध्ये गावागावात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून दिल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही असा शब्द डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी यानिमित्ताने दिला. यावेळी डोणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण श्रीकांत बोरे,राजू बोरे, राजगुरू अण्णा सर व मोठ्या संख्येने गावातील शेतकरी पदाधिकारी कार्यकर्त्ते उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!