3.7 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

अवकाळीचा तडाखा बसल्याने दाताळात ‘चक्काजाम!’ -आंदोलनात यंत्रणेची दमछाक! -आमदार राजेश एकडे यांचे नुकसान भरपाईचे आश्वासन!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/रवींद्र गव्हाळे) ‘नळगंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.. अशा आशयाची वास्तव बातमी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने आज प्रसारित केली असता नुकसानग्रस्तांनी आमच्या प्रतिनिधीचे आभार व्यक्त करीत दाताळा येथे न्यायासाठी रास्ता रोको केला.दरम्यान आमदार राजेश एकडे यांनी नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नळगंगा शंभर टक्के भरले होते. धरणाची 11 गेट उघडण्यात आल्याने दाताळा,मलकापूर शहरातील ज्ञानेश्वर नगर,संत रविदास नगर,पारपेठ नदीकाठच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, काही भागात लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याची नासाडी झाली. दरम्यान तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाताळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी यंत्रणेची मोठी दमचाक दिसून आली.स्थानिक प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी सकाळी या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या,ज्या घरात पाणी शिरले, त्यांना तत्काळ घर देण्याची सुविधा लवकरात लवकर व्हावी यासाठी तहसीलदार यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या,काही ठिकाणी खूप नुकसान झाले आहे.सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई मिळेल अशी ग्वाही आमदार राजेश एकडे यांनी यावेळी दिली‌ आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!