रायपूर (हॅलो बुलडाणा / सचिन जैस्वाल) सचिन जयस्वाल नवदुर्गा उत्सव मिरवणूक संदर्भात रायपूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न.दुर्गा उत्सव मिरवणुकीबाबत पोलीस स्टेशन रायपुर मध्ये बैठक संपन्न झाली. ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष व तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील व सरपंच तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील सरपंच पोलीस पाटील दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष व पत्रकार यांना बोलावून . सक्तीचे मार्गदर्शन दिले, गावामध्ये मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी दिली नाही. ज्या मंडळाला परवानगी नाही अशा मंडळांनी सरळ जाऊन मूर्तीचे विसर्जन करणे. त्या ठिकाणी लहान मुले नसावी, असे निर्देशन दिले. नवदुर्गा उत्सव शांततेत पार पाडावा असे मार्गदर्शन ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी केले. या बैठकीला शांतता समितीचे सदस्य श्री किसनबाहेती फारूक शेठ सौदागर, श्री बालाप्रसाद जयस्वाल, बलदेव लहाने, ज्ञानदेव सोनवणे, अनुप अहिर, जगन्नाथ चौथे, शमीम सौदागर व तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील, गावातील दुर्गा समितीचे अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, पत्रकार विठ्ठल सोनुने, सुनील खंडारे, धीरज जयस्वाल, सचिन जयस्वाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख भूमिका निभावली.