spot_img
spot_img

आमदार धीरज लिंगाडे म्हणाले.. ‘पत्रकारांची महामंडळाद्वारे आर्थिक घडी बसविणार!’ -समस्यांच्या सोडवणूकीसाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल -परवा पार पडलेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात आपण पहिल्यांदा विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये अधिवेशन काळात हा मुद्दा लावून धरला होता. यावर तासभर चर्चा झाली होती. तेव्हाच शासनाने घोषणा केली होती. या महामंडळातून पत्रकारांना आर्थिक विकासाकरिता पूरक उद्योगाकरता कर्जरूपी भांडवल मिळू शकेल. यातील निधी तरतूद व अन्य समस्या संदर्भात पाठपुरावा सुरूच राहील अशी ग्वाही अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी दिली.

व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात राज्यभर आर्थिक कल्याण विकास महामंडळाकरता लढा उभारण्यात आला होता. काल अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतर बुलढाण्यात प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात व्हाईस ऑफ मीडियाच्या टीमने व पत्रकारांनी आनंद उत्सव साजरा केला. याप्रसंगी आमदार धीरज लिंगाडे हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार लिंगाडे म्हणाले, पत्रकारांच्या आर्थिक समस्यांना वाचा फोडून त्यांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्यावे, अशी मागणी माझ्याकडे आली होती. या मागणीला विधान परिषदेमध्ये सर्वप्रथम आपण वाचा फोडली. जवळपास तासभर यावर चर्चा अधिवेशनामध्ये झाली होती. आज महाराष्ट्र सरकारकडून या संदर्भात अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचा विशेष आनंद असून पत्रकारांना देखील आगामी काळात यातून मोठी मदत होणार आहे. व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के व त्यांच्या पूर्ण टीमचे यासाठी अभिनंदन करतो. यापुढे देखील पत्रकारांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज भाऊ लिंगाडे यांनी दिली.
यावेळी सिद्धार्थ आराख, लक्ष्मीकांत बगाडे, कृष्णा सपकाळ, सुनील तिजारे, सुखनंद इंगळे, संदीप चव्हाण, हर्षनंदन वाघ, सचिन लहाने, वैभवराजे मोहिते, नदीम शेख, शौकत शहा, संदीप वांत्रोले ,रवी वायाळ, अमोल पोधाडे, राहुल रिंढे, विशाल उबाळे, दिनेश मुडे, तम्कीम शेख, यांचे सह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!