बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नवरात्रीचे नऊ रंग! या रंगासोबत गरबा मोहत्सवाचे रंग रंगत असतांना, भारतीय उद्योगविश्वाचे मुकुटमणी रतन टाटा यांचे निधन झाल्याने आजच्या नवरात्रीचे रंग काहीसे फिके झाले.कर्तव्याचेही रंग असतात त्यामुळे ‘हॅलो बुलढाणा’ च्या गरबा महोत्सवाचा आठवी माळ! चा गरबा हा
भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांना समर्पित करण्यात आलाय.
येथील राजे लॉनमध्ये यंदा प्रथमच ‘हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गरबा महोत्सवाची आजची आठवी माळ आहे. विष्णूवाडीतील राजे गार्डन येथे हा गरबा उत्सव 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होऊ घातला आहे. दरम्यान टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 28 डिसेंबर 1937 ला जन्मलेल्या रतन टाटांनी देशाच्या औद्योगिक जडण घडणीत मोलाचा वाटा उचलला.
‘टाटा’ हे फक्त नाव नाही. तर तो विश्वास, विश्वासार्हतेला असलेला समानार्थी शब्द आहे. याच टाटा समूहातील आणखी एक चकाकता हिरा म्हणजे रतन टाटा ! भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी असलेले रतन टाटा फक्त उद्योग विश्वासाठीच नव्हे तर सर्व भारतीय समाजासाठीच आदर्श होते. ज्यांच्यापुढे सर्वांनीच आदरानं नतमस्तक व्हावं अशा काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते.त्यामुळे आजचा गरबा महोत्सव फक्त एक तास घेऊन सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आदरणीय रतनजी टाटा यांच्या कार्याला ‘हॅलो बुलढाणा’ परिवारातर्फे कोटी कोटी नमन