बिबि (हॅलो बुलढाणा/भागवत आटोळे) तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना व राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने बिबि गावातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या आणी आपल्या समर्थ नेतृत्वाने गावाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव कार्यरत राहणाऱ्या बिबी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती चंदाबाई उत्तमराव गुलमोहर यांना आदर्श सरपंच पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना व राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने 2024 चा आदर्श सरपंच पुरस्कार सरपंच
चंदाबाई उत्तमराव गुलमोहर यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला आहे.
या वेळी सरपंच ताई आदर्श सरपंच पुरस्कार चे श्रेय हे बिबीवासीयांना देत असल्याच्या सरपंच म्हणाल्या. यावेळी गावातील नागरिक म्हणून संतोष बनकर, रियाज भाई, संदीप खुळे, श्रीमत आटोळे, कृष्णा पंधे , कैलास मोरे,बंडू इवरे,विजय बनकर राठोड उपस्थित होते.