देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा /संतोष जाधव) महाराष्ट्रातील थोर संत श्री भगवान बाबा यांचे परमभक्त व केंद्रीय ग्रामविकास मंत्री तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुरू केलेली भक्ती आणि शक्तीचा संगम असलेली दसरा मेळाव्याची परंपरा आज पर्यंत अखंडपणे चालत आली असून दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव, जिल्हा बीड या ठिकाणी भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन माजी मंत्री विद्यमान आमदार लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनामध्ये आयोजित केला असून 18 पगड जातीतील सर्व भक्तांनी या मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान देऊळगाव राजा येथीलश्री संत भगवान बाबा यांचे परमभक्त व लोकनेत्या माजी मंत्री व विद्यमान आमदार पंकजाताई मुंडे यांचे खंदे समर्थक युवा नेते डॉक्टर सुनील जी कायंदे यांनी केले आहे. या दसरा मेळाव्याची सुरुवात लोकनेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री व जनसामान्याचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी केली होती. दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रातून संत भगवान बाबा हयात असताना त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे भक्त येत असत, त्यानंतर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी या दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राजस्थान व आंध्र प्रदेशातून भाविक भक्त या दसरा मेळाव्यासाठी व स्वर्गीय मुंडे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी व सुखदुःखाचे व विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी लाखोच्या संख्येने एकत्र येत असत. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या निधनानंतर लोकनेत्या माजी मंत्री व विद्यमान आमदार पंकजाताई मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली असून, त्यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनामध्ये शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 ला सकाळी11 वाजता या मेळाव्याचे आयोजन सावरगाव या ठिकाणी भगवान भक्ती गडावर करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या मेळाव्यामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे व लोकनेत्या पंकजा ताईंचे विचार ऐकण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावे. परंतु येताना व्यवस्थितप्रवास करावा व सुखरूप पणे मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर सुनील कायंदे यांनी केले आहे.