(हॅलो बुलढाणा) मेहकर – अन्न- वस्त्र-निवारा ही मूलभूत गरज आहे. आमदार संजय रायमूलकर यांच्या मतदारसंघात अक्षरशा गरिबांच्या घरावर बुलडोझर चालले. विषय असा आहे की,ता.मेहकर मौजे पेनटाकळी ता.मेहकर येथील गट नं. 129 मध्ये बेकायदेशीरपणे भूमिहीन व बेघर असलेल्या घरावर
बुलडोझर चालवून संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी समिती नेमून कार्यवाही करणेबाबत
अर्जदार सौ. मनीषा रामेश्वर वानखेडे व इतर यांनी संबंधितांना रितसर मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायत सरपंच, सचिव यांनी जातिवाद करत जाणीवपूर्वक आमच्या घरावर जे.सी.बी. चालवून आमचा संसार उध्वस्त केलाय.त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून आम्ही सध्या बेघर झालेलो आहे.मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे कुठल्याही व्यक्तीला बेघर करता येत नाही. त्याच्या कुटुंबाला उघड्यावर आणता येत नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक
प्रशासनाची असते.तरी या बेकायदेशीर कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषी कर्मचारी, अधिकारी यांना निलंबित करावे अन्यथा आम्ही कुटुंबांसहित आत्मदहन आंदोलन करू व त्यातून होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील. याची नोंद घेण्यात यावी. असे स्वाक्षरीसहित निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.या गंभीर बाबीकडे बुलढाणा जिल्ह्यातील खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार रायमुलकरांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे ही देखील विनंती त्यांनी केली आहे.