बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात महिला गरबा दांडिया नृत्यावर थिरकतांना दिसताहेत. स्थानिक
योगांजली योग वर्गात पहाटेच महिला योग साधिकांनी नवरात्रीच्या पर्वावर गरबा दांडीयाचे आयोजन केले होते.गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत महिलांनी गरबा खेळण्याचा आनंद घेतला.
सध्या नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. टिपरी व गरबा नृत्यात तरुणाई दंग होत आहे. उत्सवामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.गरबा नृत्यासाठी ध्वनिक्षेपकावर हिंदी, गुजराती खानदेशी व मराठी गीतांचा बोलबाला दिसून येत आहे. दरम्यान सर्वच पारंपारिक उत्सव साजरा करणाऱ्या योगांजली वर्गात देखील ‘योग साधिकांनी’ गरबा दांडियाचा ‘योग’ साधत गरबा दांडियाचा आनंद घेतला.पहाटेच योग करून योगांजली योग वर्गात नवरात्रीच्या पर्वावर गरबा दांडीया खेळून धमाल करण्यात आली.योगशिक्षिका अंजली परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.