देऊळगांव राजा (हॅलो बुलडाणा /संतोष जाधव) आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुस्लिम युवकाची तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी त्या युवकावर गुन्हा दाखल तर केला, मात्र त्या युवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार देणाऱ्या हिंदू युवकासह 5 हिंदू युवकांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले. याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटून आज पोलिसांच्या खोट्या कारवाईच्या निषेधार्थ देऊळगावराजा शहर कड़कडीत बंद ठेवण्यात आले होते. तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण शहरातून विराट असा महामोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 ऑक्टोबर रोजी शहरातीलय एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करून छत्रपतींचा अवमान केला होता. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्या युवकास अटक करुन पोलिस स्टेशनला आणले होते. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः हुन कारवाई करणे अपेक्षित असतांनाही पोलिसांनी त्या युवकाविरुद्ध लेखी तक्रार देण्याचे शिवभक्त युवकांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सांगितल्यामुळे शिवभक्त युवकांनी त्या युवकाविरुध्द तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी शेख रेहान शेख आमान (रा. मस्जीदपुरा, देऊळगावराजा) या युवकावर गुन्हा दाखल केला होता. परंतु त्यानंतर त्या मुस्लिम युवकानेही हिंदू युवकांविरुध्द तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजीच सुरज हनुमंते, संतोष राजे जाधव, अशोक जाधव, अभि माने, साहिल मोगरकर या 5 हिंदू युवकांसह इतर व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले. सदर घटनेचे संपूर्ण परिसरात तीव्र पहासाद उमटले असून नागरिकांमध्ये पोलिसांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होतांना दिसत आहे. हिंदू समाजबांधवांच्या संतापाचे
रूपांतर आज दि.6 ऑक्टोबर रोजी रविवारी निघालेल्या विराट महामोर्चातून दिसून आले. हा महामोर्चा शहरातील मुख्य मार्गाने स्थानिक चौकात आला. त्याठिकाणी सुमारे एक दिड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी अनेकांनी भाषणातून संताप व्यक्त केला. याप्रसंगी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन या मोर्चात सहभागी झाले
होते. आंदोलना नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील असंख्य युवावर्ग व हिंदूसमाज बांधव उपस्थित होते.