सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा) सिंदखेड राजा येथील आंबेडकरी चळवळीतील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी एकीची वज्रमूठ बांधली आहे.
सर्व बौद्ध समाजाची समविचारी लोकांची
सिंदखेडराजा मतदार संघातील सामाजिक राजकीय संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर माजी लोकसभा सदस्य खासदार सुखदेव काळे यांचे अध्यक्षते खाली आंबेडकरी चळवळीतील धुरंदर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी बऱ्याच दिवसापासून असंघटित असलेला समाज एक संघ करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात येऊन आंबेडकरी समाजात असलेल्या विविध समस्या मुलभूत गरजा ओळखून तसेच अन्याय अत्याचारावर तोडगा काढण्यासाठी समाजाच्या सदर बैठकीत निर्धार करण्यात येऊन सामाजिक राजकीय मुद्द्यावर आंबेडकरी चळवळीची एक मोट बांधण्यात आली. येत्या 9 तारखेला समाजाची महत्वाची बैठक घेऊन कोअर कमिटीची स्थापना करून राजकीय सामाजिक निर्णय घेऊ असे ठरले. बऱ्याच मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि समाजाला एकसंघ करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजाने सुद्धा या बैठकीत एक संघ राहण्याचा निर्णय मान्य केला.
या सहविचार सभेचे सुत्रसंचालन बालु भाउ मस्के व आभार उध्दवभाऊ वाकोडे यांनी केले.या वेळी समाजातील नेते भाई बबनराव म्हस्के, गोल्डमेन भाई दिलीपजी खरात, अर्जुनदादा गवई,भाई भिकाजी इंगळे,भाई ब्रम्हाभाऊ पाडमुख, मधुकर शिदे अर्जुनभाऊ काकडे, प्रकाश गाडेकर, जेष्ठ पत्रकार रामदास कहाळे, कैलास झिने साहेब शरद वाघमारे नागवंशी, सिध्दार्थभाउ जाधव, तान्हाजी सोनकांबळे, विठ्ठल सोनकांबळे, मनोहर विनकर,हिम्मतराव काळे,भाई दिपक कासारे, पत्रकार गजेंद्र गवई, पत्रकार राहुल झोटे, चद्रकांत खरात सचीन खंडारे, संदीप इंगळे,आकाश कासारे, उध्दव वाकोडे,किशोर पाडमुख, भाई गजानन भाउ निकाळजे,प्रतापभाई, राजेशभाई इंगळे केरुबा लिहिणार,मदन भाई म्हस्के, गौतमभाउ खरात, विशालभाई गवई ,अनिल काकडे,मानिक जाधव, प्रमोद रंधवे या सह जेष्ठ कनिष्ठ विचारवंत मंडळी, नोकरदार वर्ग, शेतकरी कामगार पत्रकार वर्ग उपस्थित होते.