spot_img
spot_img

सेवा परमोधर्म ! -आम.संजय गायकवाडांची रुग्णाच्या उपचारार्थ ५० हजाराची मदत !

बुलडाणा (हॅलो बुलढाणा) अपघातग्रस्त कोमात गेलेल्या रुग्णाच्या उपचारार्थ सेवेसाठी तत्पर असलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी ५० हजार रुपयांच्या मदतीचा हात दिला आहे.

संजय रामधन बिरभाऊ हे कोमामध्ये असल्यामुळे त्यांच्या औषध उपचारासठी त्यांच्या पत्नीस आमदार संजय गायकवाड यांच्यावतीने रोख ५० हजार रुपयाची आर्थिक मदत ५ ऑक्टोबर रोजी देण्यात आली आहे. बुलडाणा शहरातील संगम चौक येथील सौं सोनल संजय बिरभाऊ ह्या सव येथील आईसोबत आमदार गायकवाड यांना भेटण्यासाठी आल्या, त्यानंतर त्यांनी भाऊंची भेट घेऊन पती संजय रामधन बिरभाऊ यांच्या अत्त्यवस्थेबाबत सांगितले. पती गेल्या पावणे दोन वर्षापासून कोमामध्ये असल्याचे सांगत मागील दोन वर्षा अगोदर शेगाव येथे दर्शनासाठी जात असताना निंबा फाट्याजवळ दोघा पती-पत्नीचा एक्सीडेंट झाला होता, यामध्ये संजय बीरभाऊ यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते तेव्हापासून कोमामध्ये आहेत तसेच त्यांच्या पत्नी सौ.कोमल बिरभाऊ यांचे देखील दोन्ही पाय पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना देखील खूप ईजा झालेली होती, तसेच तेव्हापासून त्यांची पत्नी एकाच जागी आहेत.घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे आणि घरामध्ये कोणताही कर्तापुरुष नसल्यामुळे औषधोपचार करण्यास अडचणी येत आहे.दरम्यान उपचारार्थ आर्थिक मदतीसाठी आमदार गायकवाड यांनी मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी उपचारासाठी ५० हजार रुपयाची आर्थिक मदत दिली तसेच यापुढे काहीही मदत लागल्यास निसंकोच कधीही मला संपर्क करा असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह तारापूर सरपंच प्रवीण जाधव, नितीन सुपे, नगरसेवक मंदार बाहेकर, शिवाजी लोखंडे, अनिल जगताप, ज्ञानेश्वर खांडवे तसेच असंख्य मित्रपरिवार आणि परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!