spot_img
spot_img

तब्बल १ लाख शेतकऱ्यांच्या रक्तीम स्वाक्षरींचे निवेदन राज्यपालांना राजभवनात देणार ! -जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांचे राज्यपालांना पत्र!

चिखली (हॅलो बुलढाणा ) सोयाबीनला ७ हजार रुपये भाव, थकलेला पिक विमा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन अनुदानाचा अनुशेष, शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीज, वन्य प्राण्यांपासून संरक्षण या मागण्यांसाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सहीचे निवेदन मुख्यमंत्र्यांनी न स्विकारता ते फाडण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या अपमानाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलन करुन १ लाख रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार असल्याचे सांगितले होते. या अनुषंगाने राहुल भाऊ बोंद्रे यांनी राज्यपालांना ३ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून वेळ मागितली आहे. शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देवून शेतकरी प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे की, चिखली विधानसभा मतदार संघातील सुमारे ३ हजार शेतक-यांनी स्वतःच्या रक्ताने स्वाक्षरी करीत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना लिहीले होते. मात्र १९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असतांना सदर स्वाक्ष-यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना लोकशाहीच्या मार्गाने देण्यासाठी गेलो असता, मी व शेतकरी तसेच माइया सहका-यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मज्जाव करीत रक्ताने लिहीले निवेदन हिसकावुन घेत पोलीस प्रशासनाने फाडुन टाकले. दंडुकेशाहीच्या जोरावर राज्याचे गृहमंत्री व पोलीस प्रशासनाने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यांचा व त्यांच्या रक्ताचा निवेदन फाडुन घोर अपमान केला. हे कृत्य अशोभनिय, निंदणीय असुन ते आम्ही कदापी सहन सहन करणार नाही अशी भुमीका घेत मी व शेतक-यांनी २३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पर्यंत आदर्श ग्राम सावरगांव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलन सुध्दा केले आहे.
१ लाख शेतकऱ्यांच्या रक्ताचे स्वाक्षरीचे निवेदन शेतकरी तयार करीत असुन सदर निवेदन आपल्याला विधानसभेच्या आदर्श आचारसंहितेपूर्वी राजभवन मुंबई येथे दयावयाचे आहे. तरी त्यासाठी ऑक्टोर २०२४ च्या दुस-या आठवडयातील आपली तारीख वेळ मिळावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे.

▪️१५ हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचा पहिला टप्पा पूर्ण !

माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या रक्ताच्या सहीने अभियानाला सुरुवात झाल्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघातील गावांमधून शेतकरी मोठ्या प्रमाणात रक्तांच्या सह्या करुन निवेदनातील मागण्यांना पाठिंबा देत आहे. कव्हळा , हरणी, मोहदरी, किन्ही नाईक, चंदनपूर , धोत्रा नाईक, वैरागड, असोला नाईक, चंदनपूर, बेराळा, डासाळा यागावांमधील १५ हजार शेतकऱ्यांच्या रक्तांच्या सह्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे हे विशेष..!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!