spot_img
spot_img

जैन समाजासाठी स्वतंत्र जैन विकास आर्थिक महामंडळाची घोषणा ! -निर्णयाचे बुलढाणा जैन समाजातर्फे जल्लोषात स्वागत !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महायुती सरकारच्या मंत्री मंडळाच्या कॅबिनेट बैठकीत जैन समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र जैन विकास आर्थिक महामंडळाची घोषणा करण्यात आली.या निर्णयाचे बुलढाणा जैन समाजातर्फे जयस्तंभ चौक येथे फटाक्याच्या आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तसेच सतत एका वर्षापासून या महामंडळाची स्थापना होण्यासाठी पाठपुरावा करणारे जैन अल्पसख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी,अल्पसख्यांक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व भाजपा जैन प्रकोष्टचे प्रदेशाध्यक्ष संदीपदादा भंडारी यांचे जैन समाजा कडून विजयजी बाफना यांनी आभार व्यक्त केले.हे महामंडळ स्थापना होण्यासाठी विविध लोकप्रतिनिधी यांचे पाठिंब्याचे पत्र तेजस भंडारी यांनी घेत बुलढाणा जिल्ह्यातर्फे पाठपुरावा केला होता.या जल्लोषात ओसवाल श्र्वेतांबर जैन संघाचे माजी अध्यक्ष विजयजी बाफना, पवणजी कोठारी,दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष सचीनजी वाडेकर, श्र्वेतांबर दादावाडी मंदिर ट्रस्ट चे माजी अध्यक्ष घनश्यामजी चोपडा,चेतनजी महाजन, मनोजजी पाटनी,अरविंदजी सैतवाल,गौतमजी बेगानी,प्रकाशजी देशलहरा,दिलीपजी कोठारी,संजयजी कोठारी,प्रदीपजी बेगाणी,सतीशजी कोठारी, डॉ.शिरिशजी जैन,तुषारजी कोठारी,रमेशजी चोपडा,तेजस भंडारी,प्रतापजी कोठारी,संतोशजी साखला ,सचिनजी देशलहरा, मनीषजी बाफना,पुष्करजी छाजेड,अभिषेकजी चोपडा,आनंदजी संचेती,शरदजी जैन,मोहित भंडारी,अक्षयजी देशलहरा,अक्षयजी छाजेड,अभय बाफना,धीरज बाफना ,महावीरजी देशलहरा यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!