8.5 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

मळणी यंत्रात हातातील कडं अटकल्याने युवकाचा पंजाच कटला! -आधुनिक शेती यंत्र हाताळण्याची काळजी घ्यावी!

चांडोळ (हॅलो बुलढाणा) मळणी यंत्रातून सोयाबीन काढतांना युवकाच्या हातातील कडं यंत्राच्या दात्यात अटकल्याने उजव्या हाताचा पंजा मनगटापासुन कटुन वेगळा झाल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथे घडली आहे.

गणेश बैरागी वय(३०)असे जख्मी झालेल्या युवकाचे नाव आहे. सकाळी ९ वा.दरम्यान गणेश बैरागी आपला मालकीचे ट्रॅक्टर घेऊन मजुरा सोबत चांडोळ येथील शेतकरी गणेश राऊत यांच्या शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेला होता. ट्रॅक्टरच्या यंत्रात सोयाबीन लोटण्याचे काम गणेश करत होता. सोयाबीनचा काड यंत्रात लोटता लोटता मशीनच्या दात्यात उजव्या हातातील कडं आटकले आणि गणेशचे मनगट आत ओढल्या जात असल्याचे मजुरांना दिसताच गणेशला बाहेर ओढले नाहीतर जख्मी गणेशला यंत्राने आत ओढले असते. यंत्रात हातातील कडा यंत्राच्या दात्यात अटकल्याने उजव्या हाताचा मनगटापासुन कटुन वेगळा झाला. ट्रॅक्टर कामावरील मजुरांचे गणेश कडे लक्ष नसते त्याला जीव गमवावा लागला असता.यंत्रात जख्मी झालेल्या गणेशला छातीला व डोक्याला मार लागला आहे. बुलढाणा येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले नंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

▪️आधुनिक काळातील शेती उपयोगी साधनांची विशेष काळजी घेणे गरजेचे !

ट्रॅक्टरवरील मळणी यंत्र,कुट्टी मशीन,चारा कटर,रोटाव्हेटर, पेरणी यंत्र हाताळतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मशनरी हताळतांना गळयात रुमाल,हातात कडे नसावे,हाताच्या दोन्ही बाहया वर असाव्या,नशा केलेला नसावा ही काळजी शेतकरी,शेतमजुर,शेतातील वाहन धारकाने घेणे गरजेचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!