बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागवतीने स्वच्छता अभियान आणि पथनाटट्याचे सादरीकरण करून राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. समाज भूषण पंढरीनाथ पाटील यांच्या पुणयतिथीनिमित्त व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा अंतर्गत बुलढाणा शहरातील गांधी भवन व जयस्तंभ चौक,छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर स्वच्छ करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आलाय. तसेच कार्यक्रमाधिकारी प्रा गजानन लोहटे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. राजश्री येवले तसेच सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रदीप वाघ आणि प्रा.रामेश्वर बनकर या सर्वाच्या मार्गदर्शनात जगदंबा देवी जवळील परिसर स्वच्छता करण्यात आली व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी येथे स्वच्छते संदर्भात पथनाट्य लोक जागरण गीत सादर केले. उपस्थितांनी या कार्यक्रमाला दाद दिली.







Hellobuldana





