बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यातल्या सर्व कुटुंबांना 200 युनिट 5 वर्षासाठी विद्युत बिल माफ करा व गॅस सिलेंडर पाचशे रुपयांमध्ये द्या,अशा मागण्या करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड.जितेंद्र जैन यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
जितेंद्र जैन म्हणाले की,ना. फडणवीस साहेब
शेतकऱ्यांना गरीब,अत्यंत गरीब अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसेच वंचित,पीडित शोषितांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या परंतु मध्यम व उच्च मध्यमवर्गीय करीता कोणत्याच प्रकारची सवलत योजना किंवा त्यांना दिलासा मिळेल असं आपल्या सरकारकडून मागील काळात घडलेले नाही.
मध्यम,उच्च मध्यमवर्गीय यांना तुम्ही गृहीत धरले आहे का? यांच्या मतांची गरज नाही का ? बहिणी तुमच्या लाडक्या नाहीत ?असे प्रश्न उपस्थित करीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना 200 युनिट 5 वर्षासाठी विद्युत बिल माफ करा गॅस सिलेंडर पाचशे रुपयांमध्ये द्या.अशी मागणी देखील केली आहे.