लोणार (हॅलो बुलढाणा /संदीप मापारी ) तालुक्यातील खुरामपूर येथील पारधी समाजातील बापलेकांचा करूण अंत झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.शॉक लागून ही घटना घडली असे सांगण्यात येत असले तरी,हा घातापाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.बापलेक सोयाबीन सोंगण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.
सुनील यंगन पवार व यंगन पवार अशी मृतकाची नाव आहे. दोघे बापलेक खुरामपूर येथील असून ते पारडा दराडे शिवारातील गायरान जमिनीतील सोयाबीन सोंगण्यासाठी गेले होते.परंतु दोघांचा मृतदेह ओढ्यातील वाहत्या पाण्यात आढळला.दरम्यान हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय मृतकांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता
दुपारी चार वाजेपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह जागेवरून हलवू दिला नव्हता लोणार ग्रामीण रुग्णालयासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता.याप्रकरणी लोणार पोलीस अधिक तपास करीत आहेत.