spot_img
spot_img

वऱ्हाडातील २८ हजारापेक्षा जास्त ग्राहक झाले डिजीटल ! -बुलढाण्यात ६,७९५ ग्राहकांचा ‘गो-ग्रीन’ योजनेत समावेश ! – छापील बिल नाकारल्याने वर्षाकाठी होते ३४ लाखाची बचत

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वऱ्हाडातील २८ हजार ४२३ वीज ग्राहकांनी छापील वीजबिल नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो – ग्रीन सेवेचा लाभ घेतल्याने त्यांची वर्षाकाठी ३४ लाख १० हजार ७६० रूपयाची बचत होते. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रत्येक वीजबिलामागे दर महीन्याला १० आणि वर्षाला १२० रूपयाची सुट देण्यात येते.

महावितरण (MSEDCL) ने ग्राहकांसाठी पर्यावरणपूरक “गो ग्रीन” योजना सुरू केली आहे, ज्याचा उद्देश कागदाचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करणे आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणे आहे. या योजनेअंतर्गत महावितरण ग्राहकांना त्यांचे वीजबिल ईमेलद्वारे मिळते, ज्यामुळे कागदी बिलांचा वापर टाळता येतो. या योजनेमुळे झाडे वाचवण्यास मदत होते, कारण प्रत्येक महिन्यात लाखो कागदी बिले पाठवण्याची गरज कमी होते.

▪️ गुप्तता आणि सुरक्षा: ईमेलद्वारे बिल मिळाल्याने बिल सुरक्षित असते आणि याचा मागोवा घेणं सोपं असतं. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमधून बिलासाठी कागदाचा वापर बंद केला तरी वीज बिलाची दरमहा प्रत संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे. सद्यस्थितीत वऱ्हाडाअंतर्गत अमरावती (८,०३८),
यवतमाळ (५,३५३),अकोला (५,७४३),बुलडाणा (६,७९५) आणि वाशीम (२,४९४) ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!