बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आज 30 सप्टेंबर रोजी जयस्तंभ चौक येथे आरक्षण बचाव रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.घोषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये या मागणीसाठी आज रोजी जयस्तंभ येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नंदनीताई टारपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या आंदोलना दरम्यान जयस्तंभ चौक येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. जयस्तंभ चौकातील हे रास्ता रोको आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना घटनास्थळावरून डिटेक्ट केले आहे व पुढील कारवाई बुलढाणा शहर पोलीस स्टेशन करीत आहे.