3.7 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

ऐतिहासिक बचत गट महिला प्रदर्शनी देणार ‘दिशा!’ -महिलांनी बचत गट प्रदर्शनीचा लाभ घ्यावा ! -संस्थापक अध्यक्ष ॲड. जयश्रीताई शेळके यांचे आवाहन !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने बुलडाणा येथील मलकापूर रोडवरील एआरडी सिटीमॉलच्या मागे, बुलडाणा रेसिडेन्सीसमोरील मैदानावर ४ ते ६ ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत बुलडाणा जिल्ह्यातील २५० हून अधिक स्टॉल लावण्यात येणार आहेत. महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ही मोठी संधी आहे. बचत गटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष ॲड.जयश्री शेळके यांनी केले आहे.

तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे २६ सप्टेंबर रोजी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर गावच्या सरपंच प्रज्ञाताई कांबळे, उपसरपंच शामभाऊ सावळे, गावातील प्रतिष्ठ‍ीत व्यक्ती तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी. आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये प्रगती साधावी. स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे. बचत गट ही एक आर्थ‍िक चळवळ आहे. जिल्ह्यातील १४०० हून अधिक बचत गट दिशा फेडरेशनसोबत जुळलेले आहेत. असेही यावेळी बोलतांना जयश्री शेळके यांनी सांगितले.

बचत गटांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम दिशा फेडरेशनकडून करण्यात येते. बचत गटांनी आपल्या बचतीच्या माध्यमातून आणि भांडवलातून व्यवसाय उभारण्यासाठी व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावा. असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले. बैठकीला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!