spot_img
spot_img

💥 पॉलिटिक्स ! खासदार मुकुल वासनिक यांचा वाढदिवस धृपतराव सावळें साठी ठरला ‘खास’ ? -शॉर्ट पण काय केली महत्वाची चर्चा? -राजकिय वर्तुळात चर्चेचे गुऱ्हाळ !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) परवा काँग्रसचे खासदार मुकुल वासनिक यांचा वाढदिवस ‘खास’ करण्यासाठी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेले बुलढाण्याचे माजी आमदार धृपतराव सावळे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले अन् हा दिवस दोघांसाठी ‘खास’ ठरला! दरम्यान यावेळी ‘खास’ चर्चाही झाली ती धृपतरावांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘खास’ ठरू शकते!

परवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव आणि राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांच्या जन्मदिनी त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी माजी आमदार धृपतराव सावळे यांनी भेट घेऊन
त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी वासनिक यांच्याशी शॉर्ट पण महत्वाची चर्चा झाली आहे. धृपतराव सावळे यांच्या व्यक्तिमत्त्वावर म्हणा किंवा कारकिर्दीवर दृष्टीक्षेप टाकला तर ते जिल्ह्यातील मातब्बर व जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.
त्यांनी बुलढाण्याचे माजी आमदार पद भूषविले आहे. ते तेव्हा भाजपचे नेते होते.आधी काँग्रेस नंतर भाजपा आणि पुन्हा काँग्रेस असा त्यांचा प्रवास सुरू आहे. त्यांनी नुकताच भाजपला पंजा दाखविला आहे. सरपंच ते आमदार अशी त्यांची कारकिर्द राहीली.
राजकीय वर्तुळात सावळे एक मुरब्बी व जनाधार असलेले नेते म्हणून परिचित आहेत.धृपतराव सावळे यांनी काँग्रेसमधून 21 ऑगस्ट 2015 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावळे यांना अनेक कार्यक्रमात डावलले जात असल्याने पक्षांतर्गत धूसफुसीमुळे त्यांच्यात नाराजी दिसून येत होती. दरम्यान धृपतराव सावळे यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सध्यातरी रंगत आहे.दरम्यान त्यांनी परवा काँग्रसचे खासदार मुकुल वासनिक यांचा वाढदिवस ‘खास’ करण्यासाठी दिल्लीत सदिच्छा भेट घेतल्याने त्यांनी खा. वासनिक यांच्याशी काय चर्चा केली असेल ? याबाबत राजकीय जाणकार चर्चा करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!