spot_img
spot_img

💥Exclusive त्या बापलेकांचा मृतदेह सापडला! -मुलाचे चिंचखेड शिवारात तर बापाचे गोंधनखेड शिवारात प्रेत आढळले !

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) तालुक्यातील उंबरखेडच्या पुढे नाल्यामध्ये बापलेक वाहून गेल्याची घटना 27 सप्टेंबरला घडली होती.ते 25 सप्टेंबर पासून घरून बेपत्ता होते.अखेर त्यांचा मृतदेह रेस्क्यू टीमला आढळून आला आहे. मुलाचे चिंचखेड शिवारात तर बापाचे गोंधनखेड शिवारात प्रेत आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पिंपळगाव चिलमखा येथील, दीपक प्रल्हाद निकाळजे वय 29, अथर्व दीपक निकाळजे वय 5 वर्ष दोघे उंबरखेड येथील ओढ्यातून वाहून गेले होते. त्यांची मोटरसायकल उंबरखेड येथील ओढ्याजवळ मिळून आली होती. दरम्यान शोध मोहीम राबविण्यात आली.अखेर आज मुलाचे चिंचखेड शिवारात तर बापाचे गोंधनखेड शिवारात प्रेत आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!