चिखली (हॅलो बुलढाणा) लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विश्वास दुणावला आहे. सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जनतेचा रोष ओढावत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षातील दमदार नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत.दरम्यान चिखली नगर परिषद भाजपाचे गटनेते तथा नगरसेवक प्रा.राजू गवई यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन भाजपाला धक्का दिल्याचे मानल्या जात आहे.
प्रा. राजू गवई यांचे कार्य पूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघाला माहित आहे. त्यामुळे त्यांनी विकास कार्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाची साथ देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांचे समर्थक सांगताहेत.
प्रा.गवई यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून दमदार नेतृत्व असलेल्या माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी काँग्रेसला साथ देऊन चिखली विधानसभा मतदार संघाचा विकास करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.