spot_img
spot_img

💥 Exclusive – अखेर बचाव पथकाने त्या व्यक्तीचे प्रेत शोधले ! -सकाळपासूनची शोधमोहीम साडेअकरा वाजेपर्यंत चालली ! -‘हॅलो बुलढाणा’ने रेटून धरला होता प्रश्न!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मौजे खामगाव येथील प्रदीप श्रीरंग जाधव हा 30 वर्षीय व्यक्ती गावाकडे परतत असताना खामगाव गावाजवळील पूला समोरील ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना 27 सप्टेंबरला घडली होती.दरम्यान आज सकाळपासूनच जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाच्या बचाव पथकाने शोध मोहीम राबवली असून साडेअकरा वाजता सदर व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे.

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ओढ्या नद्यांना पूर आला आहे. दरम्यान मौजे खामगाव येथील प्रदीप श्रीरंग जाधव हा 30 वर्षीय व्यक्ती गावाकडे परतत होता. तो घरी न पोहोचल्यामुळे आज सकाळी 28 सप्टेंबरला गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांची मोटारसायकल व बॅग ही खामगाव गावाजवळील पूला समोरील ओढ्या शेजारी आढळून आली होती. रात्र झाल्याने शोध बचाव पथक थांबलेले होते.दरम्यान आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली होती. 11.30 च्या सुमारास सदर मृत व्यक्तीचे प्रेत आढळून आले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात या पथकाने कामगिरी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!