बुलढाणा (हॅलो बुलढाणा) परतीच्या पावसाचा कहर सुरू असून यामध्ये दोन जण दगावले तर एक गंभीर झाल्याची घटना समोर आली आहे.
गोठ्यात वीज पडल्याने महाळुंगी ता. मोताळा येथील शेतकरी संतोष बळीराम तिडके यांची दोन जनावरे, एक बैल व एक गाय दगावली व एक बैल जखमी झाला आहे.
शेतकऱ्यांवर संकट ओढावतच असून यंत्रणा कुचकामी ठरत आहे.उपायोजना करण्या पेक्षा पशुधन मृत्युमुखी पडल्यावर नाम मात्र पैसे देण्यात येतात.तेही विलंबाने!त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांची अवस्था चिंताजनक झाली आहे.
गेल्या दोन दिवसात सर्वत्र पाऊस कोसळत आहे.दरम्यान महाळुंगी ता. मोताळा येथील शेतकरी संतोष बळीराम तिडके यांच्या गोठ्यावर वीज पडल्याने पशुहानी झाली आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागत असून त्यांनी तात्काळ नुकसान भरपाईच्या मदतीची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके यांनी या नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट दिली व धीर दिला आहे.