मलकापुर (हॅलो बुलडाणा/करन झनके) तालुक्यातील ग्राम तेलखेड येथील शेतातील व गावातील एकच विद्युत डीपी असल्यामुळे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार घडत असून यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने नळगंगा नदीला पूर आल्याने या गावच्या पिण्याच्या पाण्याची विहिरीत खसली असून वेळोवेळी लाईट ये जा करीत असल्याने ग्रामस्थांचे पिण्याचे पाण्याचे हाल होत असून गेल्या दीड महिन्यापासून या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे, आज लोकनेते ॲड हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महिलांनी म.रा. वि.वि कंपनी कार्यालयाला धडक दिली असून या गावातील समस्या तात्काळ सोडविण्याचे ॲड रावळ यांनी कार्यकारी अभियंता मिश्रा यांना सांगितले, दोन दिवसात या गावातील समस्या सोडवून तिथं नवीन डी.पी बसविण्यात यावी अन्यथा म.रा.वि.वि कंपनी कार्यालयातच आमरण उपोषण करू असा इशारा दिला,यावेळी सीमा गजानन सौंदळे, रेखा जालमसिंग सौंदळे, पूनम प्रदीप सौंदळे, रेणुका प्रदीप सौंदळे, उषा गोपाळसिंह सौंदळे, ज्योती विजयसिंह सौंदळे, मंदा दिलीप धरमकार, कमलबाई राजधरसिंह सोळुंके, मंदा गजानन इंगळे, लता विलास इंगळे,आशा गजानन इंगळे, गोकुळा विष्णू इंगळे, नंदाबाई कापरसिंग सौंदळे, उषा गोपाल सौंदळे,बाळूभाऊ ठाकरे, सुरेश दांडगे, सुधाकर दांडगे सह आदिंची उपस्थिती होती.