खामगाव (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्ह्याला हवामान खात्याने दिलेला अंदाजानुसार आज बुधवारी पहाटे जिल्ह्यातील खामगाव, शेगाव तालुक्यातील सर्वत्र ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली गेल्या तीन चार दिवसापासून उकाळापासून त्रास सहन करत असलेले नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी शेती पिकाला आवश्यक असल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना फार गरज होती परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यास मात्र शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कभी खुशी कभी गम यासारखी परिस्थिती दिसून येत आहे……












