spot_img
spot_img

💥 Exclusive वीरमरण ! ‘कर चले हम फ़िदा जान-ओ-तन साथियों,अब तुम्हारे हवाले वतन साथियों!’ -आतंकवाद्यांशी लढताना अखेर ‘दीपक’ विझलाय!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना आतंकवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो येथील सैन्य दलात कार्यरत असलेल्या दीपक बनसोडे यांनी वीरमरण पत्करले!शत्रूंशी शेवटपर्यंत लढणारा हा लढवय्या अखेर शहीद झाल्याने पळसखेड नागो सह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो येथील भूमिपुत्र दीपक बनसोडे गत 5 वर्षापासून सैन्य दलाल कार्यरत आहेत.शहीद जवान दीपक बनसोडे यांनी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात प्रत्युत्तर देत असताना वीरमरण आले.
22 सप्टेंबर 2024 ला जम्मू-काश्मीर येथे हेडकॉटर सेवन सेक्टर आर आर या ठिकाणी ते शहीद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आज दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबई येथे विमानाने त्यांचा मृतदेह आणण्यात येईल. ॲम्बुलन्स द्वारे त्यांच्या राहत्या घरी पळसखेड नागो येथे मृतदेह आल्यानंतर 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यात सह गावात शोकाकूल वातावरण पसरलेले आहे.

हॅलो बुलढाणा परिवाराकडून भारत मातेच्या वीर पुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली! 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!